धक्कादायक! पंजाबच्या तुरुंगात हाणामारी; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील ३ आरोपी ठार

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या आरोपांमध्ये गोइंदवाल तुरुंगात असलेल्या ३ आरोपींची तुरुंगातच हत्या करण्यात आली
धक्कादायक! पंजाबच्या तुरुंगात हाणामारी; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील ३ आरोपी ठार
Published on

गेल्यावर्षी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३ जणांची तुरुंगातच हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तुरुंगामध्ये झालेल्या किरकोळ वादातून या तिघांची हत्या करण्यात आली असून आणखी ४ गुन्हेगार यामध्ये जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार गोइंदवाल तुरुंगात घडला असून मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यानंतर त्याला इतर कैद्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ३ ते ४ कैदी जखमी झाले असून ३ आरोपींचा मृत्यू झाला आहे. शूटर मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहना यांचा जागीच मृत्यू झाला. तर केशव बठिंडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in