दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शिख म्हणाले, 'भारत आमचा स्वाभिमान'; नेमकं काय घडलं?

दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शिख म्हणाले, 'भारत आमचा स्वाभिमान'; नेमकं काय घडलं?

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर होणाऱ्या कारवाईविरोधात लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी केलेल्या विरोधादरम्यान भारतीय ध्वजाचा अपमान
Published on

आज लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर काही खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर होत असलेल्या कारवाईचा निषेध केला. यावेळी त्यांनी उच्चायुक्तालयात तोडफोडदेखील केल्याची माहिती समोर आली.एव्हढंच नव्हे तर यावेळी भारतीय तिरंग्याचा अपमानदेखील झाला. याचाच निषेध म्हणून आज भारतीय शीख बांधवांनी खलिस्तानींच्या विरोधात बॅनर आणि पोस्टर झळकावले आणि लंडनमध्ये घडलेल्या भारतीय तिरंग्याच्या अपमानाचा निषेधदेखील केला.

दिल्लीतील काही शीख बांधव नवी दिल्लीत मोठ्या संख्येने ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर जमले. यावेळी त्यांनी खलिस्तानींनी केलेल्या कृतीचा निषेध केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत, "भारत हा आमचा स्वाभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही." असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, पंजाब पोलिसांकडून होत असलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवरील कारवाईवरून रविवारी लंडनमध्ये उपस्थित असलेल्या काही खलिस्तान समर्थकांनी विरोध केला. त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात असलेला तिरंगा उतरवला.

logo
marathi.freepressjournal.in