राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाचा रौप्यमहोत्सवी सोहळा

कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मांडविया यांनी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणचे (एनपीपीए) अभिनंदन केले
राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाचा रौप्यमहोत्सवी सोहळा

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी संबोधित केले. रसायन आणि खते आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सत्रात, इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम २.० (IPDMS २.०) आणि फार्मा सही दाम २.० अॅपचे उद्‌घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मांडविया यांनी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणचे (एनपीपीए) अभिनंदन केले. एनपीपीएने केवळ नियामक म्हणून काम न करता एक सहाय्यक म्हणून अधिक काम केल्याचे ते म्हणाले. मागील २५ वर्षांत किफायतशीर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एनपीपीएने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. सातत्याने दर्जेदार उत्पादनांची निर्मिती केल्याबद्दल भारतीय उद्योगांची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. केवळ व्यावसायिक हेतूसाठी नव्हे तर लोकांच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी औषध निर्मिती आणि नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.

डॉ. मांडविया यांनी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांना दिले. त्यांनी उद्योगांसाठी सादर केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहनाच्या 2 योजनांचा उल्लेख केला, ज्यामुळे अनेक महत्वपूर्ण औषधी घटकांचे स्वदेशी उत्पादन घेण्यात मदत झाली आहे.

कोविड संकटाच्या काळात भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांनी दिलेल्या सकारात्मक योगदानाचीही त्यांनी आठवण करून दिली. त्याचबरोबर जनतेपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यात उत्तम सहकार्य आणि समन्वय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in