कर्मचाऱ्याच्या खात्यात २८६ महिन्यांचा पगार एकाच वेळी जमा

या कर्मचाऱ्याला पैसे परत करण्यास सांगितले असता त्याने कंपनीला लवकरच पैसे परत करू, असे आश्वासन दिले
कर्मचाऱ्याच्या खात्यात २८६ महिन्यांचा पगार एकाच वेळी जमा

प्रत्येक नोकरदार १ तारखेला पगार बँक खात्यात जमा होण्याची पगाराची आतुरतेने वाट पाहत असतो. परंतु एक कर्मचारी असा आहे, त्याच्या खात्यात एक नाही, दोन नाही, संपूर्ण २८६ महिन्यांचा पगार एकत्र आला आहे. हे चिलीमधील एका व्यक्तीसोबत घडले आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात चिलीच्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यात २८६ महिन्यांचा पगार एकाच वेळी जमा झाला.

विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला पैसे परत करण्यास सांगितले असता त्याने कंपनीला लवकरच पैसे परत करू, असे आश्वासन दिले. परंतु संधी पाहून तो गायब झाला. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांच्या खात्यात २८६ महिन्यांचा पगार गेल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला पैसे परत करण्यास सांगण्यात आले. त्या कर्मचाऱ्यानेही पैसे परत करण्यास होकार दिला. पण संधी पाहून गायब झाला. कंपनीचा राजीनामा दिल्यानंतर तो कुठे गेला याची फारशी माहिती कोणाकडे नाही.

रिपोर्ट्सनुसार, Consorcio Industrial de Alimentos नावाच्या चिलीच्या कंपनीने ५लाख पेसो (चिलीचे चलन) म्हणजे १६.४३ कोटी पेसोऐवजी सुमारे ४३ हजार रुपये, म्हणजे भारतीय रुपयांनुसार सुमारे १.४२ कोटी रुपये पाठवले. कंपनी व्यवस्थापनाने खाते तपासले असता ही चूक उघडकीस आली. ही बाब उघडकीस आल्यानंतर कंपनीने संबंधित कर्मचाऱ्याशी बोलणे केले. कर्मचाऱ्याला बँकेत जाऊन अतिरिक्त पैसे परत करण्यास सांगितले, मात्र त्याने तसे केले नाही. कंपनी त्या कर्मचाऱ्याची वाट पाहत राहिली, पण पैशाच्या बदल्यात त्या कर्मचाऱ्याने २ जून रोजी राजीनामा पाठवला. आता कंपनीने याप्रकरणी कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in