सिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय

एफडीआय असलेल्या देशांच्या यादीतून शेजारी देश चीनचे नाव गायब आहे
सिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय

भारतात सिंगापूर-अमेरिकेकडून मिळाला सर्वाधिक एफडीआय अर्थात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात, भारताला ५८.८अब्ज डॉलर्सचा एफडीआय प्राप्त झाला. त्यामध्ये सिंगापूरची गुंतवणूक सर्वाधिक होती. त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक लागतो. जगात असे १५ देश आहेत, जे भारतात सर्वाधिक गुंतवणूक करतात.

या यादीत सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसची हे प्रमुख देश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एफडीआय असलेल्या देशांच्या यादीतून शेजारी देश चीनचे नाव गायब आहे. केवळ चालू आर्थिक वर्षापासूनच नव्हे तर २०१७-१८ या कालावधीपासून भारतात विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या यादीतून चीनचे नाव गायब आहे. एफडीआयची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केली असून आयएएनएस या वृत्तसंस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. १५.९ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह एफडीआयच्या यादीत सिंगापूर प्रथम स्थानावर आहे. यानंतर १०.५ अब्ज डॉलर्स एफडीआयसह अमेरिका दुसऱ्या आणि ९.४ अब्ज डॉलर्ससह मॉरिशस तिसऱ्या स्थानावर आहे.

या देशांनंतर आता टॅक्स हेवन केमन आयलंडनेही भारतात मोठी एफडीआय केली आहे. केमन आयलंडने भारतात ३.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे केमन आयलंडने यूके, जर्मनी, यूएई, जपान आणि फ्रान्ससारख्या जगातील अनेक महासत्तांना मागे टाकले आहे.

केमन आयलंडमधील एफडीआयबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, भारतात गुंतवलेला हा पैसा ही योग्य गुंतवणूक आहे. जर आपण गेल्या ५ वर्षांचा लेखाजोखा पाहिला तर २०१७-१८ पासून सिंगापूर सातत्याने भारतात सर्वाधिक एफडीआय करणारा देश राहिला आहे. या छोट्या देशाने भारतात २०१७-१८मध्ये १२.२ अब्ज डॉलर, २०१८-१९मध्ये १६.२ अब्ज डॉलर, २०१९-२०मध्ये १४.७ अब्ज डॉलर आणि २०२०-२१मध्ये १७.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली.

चीनमधील ८० कंपन्यांना भारतात

गुंतवणूक करण्यास मान्यता

गेल्या पाच वर्षांत सिंगापूरनंतर एफडीआयमध्ये अमेरिका आणि मॉरिशसचे नाव अग्रक्रमाने राहिले आहे. या देशांच्या यादीत चीनचे नाव नाही. भारत सरकार प्रथम चिनी कंपन्यांना मान्यता देते, त्यानंतरच एफडीआयची चर्चा होते. या वर्षी जुलैमध्ये चिनी कंपन्यांकडून ३८२ एफडीआय प्रस्ताव आले होते, त्यापैकी केवळ ८० कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली होती. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर्मनी, कॅनडा, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या देशांनी २०२१-२२मध्ये भारतात १ अब्ज डॉलरहून कमी गुंतवणूक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in