Lucky Ali : सुप्रसिद्ध गायक लकी अलीची शेतजमीन आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने बळकावली? पोस्ट चर्चेत

सुप्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) याने एका पोस्ट शेअर करत त्याच्या शेतजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असल्याचा आरोप केला आहे.
Lucky Ali : सुप्रसिद्ध गायक लकी अलीची शेतजमीन आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने बळकावली? पोस्ट चर्चेत

'ओ सनम' हे गाणं सोशल मीडियावर वायरल झालं आणि पुन्हा एकदा ९०च्या दशकातला सुप्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) चर्चेत आला. पण, सध्या त्याने केलेल्या एका पोस्टवर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे की, "बेंगळुरूमध्ये असलेल्या शेतजमिनीवर कोणीतरी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. मला यावर उपाय हवा आहे. " पुढे त्याने, एका भुमाफियाने सनदी अधिकारीच्या पत्नीच्या मदतीने शेतजमिन बळकावली. माझ्या जमिनीवर ते स्वतःचा हक्क सांगत आहेत, असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत.

गायक लकी अली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, "केंचनहल्ली येलाहंका येथे माझ्या शेतात ट्रस्ट प्रॉपर्टी आहे. बेंगळुरूच्या भूमाफियाच्या साहाय्याने सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे बळकावली आहे. रोहिणी सिंधुरी या आयएएस अधिकारीच्या मदतीने त्यांनी हे कृत्य केले आहे. त्या स्वतःच्या फायद्यासाठी राज्यातील सुविधांचा गैरवापर करत आहेत. ते लोक जबरदस्तीने माझ्या शेतात घुसले असून आवश्यक कागदपत्रे दाखवण्यास नकार देत आहेत." अशी तक्रार त्याने केली आहे.

पुढे पोस्टमध्ये त्याने सांगितले आहे की, "माझ्या वकिलाने मला याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आम्हाला इथे राहून ५०हुन अधिक वर्षे झाली. आता काही नवीन लोकं तिथं जावून त्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझे कुटुंब आणि लहान मुले फार्मवर एकटे आहेत. मला स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. उलट ते अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की ७ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपूर्वी हे बेकायदेशीर कृत्य थांबवा. कृपया आम्हाला न्याय द्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे सर्व लोकांसमोर आणले."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in