मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट, राष्ट्रपती राजवटीची गरज; विरोधी पक्षांच्या खासदारांनी सांगितली आपबीती

राज्याच्या अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबार झाल्याचे आवाज येतात, असा दावा खासदारांनी केला आहे
मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट, राष्ट्रपती राजवटीची गरज; विरोधी पक्षांच्या खासदारांनी सांगितली आपबीती

मणिपूरमध्ये ३ मे पासून सुरु झालेला हिंसाचार अजुनही थांबण्याचं नाव घेत नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या २१ खासदारांच्या शिंष्टमंडळाने दोन दिवसीय मणिपूर दौरा केला होता. आज या खासदारांच्या शिष्टमंडळाचा मणिपूर दौरा संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळममध्ये मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. यानंतर हे खासदार दिल्लीला परतले.

दिल्लीला पोहचल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सांगितलं की, मणिपूरमध्ये पिरिस्थिती अत्यंत वाईल आहे. दोन्ही समुदायांमध्ये अजूनही तणाव आहे. राज्याच्या अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबार झाल्याचे आवाज येतात, असा दावा खासदारांनी केला आहे. तसंच खासदारांच्या या शिष्टमंडळाने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मणिपूर राज्यात सध्या राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याने बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,असं खासदारांच्या शिष्टमंडळाने सांगितलं आहे. यावेळी बोलातना या खासदारांनी सांगितलं की परिस्थिती एवढी बिकट आहे की राज्याचे राज्यपाल देखील हतबल होऊन काही करु शकत नाहीत. अशी गंभीर परिस्थिती असून केंद्र सरकार शांत बसलं असल्याचा आरोप देखील या खासदारांनी केला आहे.

मणिपूर राज्यात ३ मे रोजी कुकी समुदायाकडून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत कुकी आणि मैतेई समुदायाचे लोक आमनेसामने आले आणि काही वेळातच या भाडणाचे रुपांतर हिंसाचारात झाले.राज्याच्या विविध भागात हजारो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत १५० हुन अधिक लोकांचा बळी गेला आहे. हजारो नागरिकांना छावण्यामध्ये राहावे लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in