Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू

केदारनाथमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुकं असल्याने या भागातील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम
Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्पवरून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केले आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दिली. सदर हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. केदारनाथमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुकं असल्याने या भागातील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in