हरयाणात स्कूलबस उलटून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू;१५ जण जखमी

महेंद्रगड येथील कनिना भागात जीएल पब्लिक स्कूलची बस गुरुवारी सकाळी मुलांना घेऊन शाळेत चालली होती. उन्हानी गावाजवळ स्कूलबस ओव्हरटेक करताना अचानक पलटली. यावेळी जोरदार आवाज झाला.
हरयाणात स्कूलबस उलटून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू;१५ जण जखमी
Published on

महेंद्रगड : हरयाणातील महेंद्रगड येथे गुरुवारी सकाळी खासगी शाळेची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

महेंद्रगड येथील कनिना भागात जीएल पब्लिक स्कूलची बस गुरुवारी सकाळी मुलांना घेऊन शाळेत चालली होती. उन्हानी गावाजवळ स्कूलबस ओव्हरटेक करताना अचानक पलटली. यावेळी जोरदार आवाज झाला.

बसचा चालक दारूच्या नशेत

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या अपघातग्रस्त बसचा चालक दारू पिऊन वाहन चालवत होता. तो बस वेगाने चालवत होता. बसवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडाला आपटली. त्यातून हा अपघात झाला. बसमध्ये २० ते २५ मुले होती. चालक झोपेत होता की त्याने नशा केली होती याचा तपास केला जाणार आहे. आज ईदनिमित्त सर्व सरकारी शाळा व कार्यालयांना सुट्टी होती. मात्र, या खासगी शाळेने सुट्टी दिली नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in