वैनगंगा नदीत बोट उलटून सहा महिला बुडाल्या

या बोटीत सर्व महिला होत्या. जोरदार वाऱ्यामुळे ही बोट सकाळी ११ वाजता नदीच्या प्रवाहात उलटली.
File photo
File photo
Published on: 

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यात जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर गावातनजीक वैनगंगा नदीत एक बोट उलटून सहा महिला बुडाल्या. त्यातील एका महिलेचा मृतदेह सापडला, तर अन्य पाच महिला बेपत्ता आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

या बोटीत सर्व महिला होत्या. जोरदार वाऱ्यामुळे ही बोट सकाळी ११ वाजता नदीच्या प्रवाहात उलटली. बोटीतून जाणाऱ्या सर्व महिला या नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात जात असताना ही दुर्घटना घडली. यातील एका महिलेचा मृतदेह हाती लागला आहे. अन्य व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in