ओदिशात ट्रक अपघातात सहा कामगार ठार

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
File Photo
File Photo

मलकानगिरी : ओदिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात शनिवारी चित्रकोंडाहून जोडंबाकडे जाणारा सिमेंटने भरलेला ट्रक हंतलागुडा घाटात उलटून त्यातील सहा कामगार ठार झाले आणि सात जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच अन्य एका दुर्घटनेत ट्रक व मोटारसायकल यांच्या टकरीत तीन जण ठार झाले. नयागड जिल्ह्यातील दसपल्ला भागात हा अपघात झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in