पावसानंतर दिल्लीच्या हवेत किंचित सुधारणा तरीही ‘खराब’ श्रेणीतच

दोन दिवस सकाळी किंचित धुक्यासह आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पावसानंतर दिल्लीच्या हवेत किंचित सुधारणा
तरीही ‘खराब’ श्रेणीतच

नवी दिल्ली : शुक्रवारी झालेल्या पावसानंतर शनिवारी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पूर्वी 'खूप खराब' म्हणून वर्गीकृत केलेली हवेची गुणवत्ता आता 'खराब' श्रेणीपर्यंत सुधारली आहे. मात्र, एकंदर हवेची गुणवत्ता अद्याप वाईटच आहे. रविवारनंतरचे पुढील दोन दिवस सकाळी धुके असलेले आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आणि त्यानंतरचे दोन दिवस सकाळी किंचित धुक्यासह आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सरकारच्या हवा-गुणवत्ता मॉनिटरिंग एजन्सी सफरच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील एकूण हवेची गुणवत्ता ४०७ होती. शनिवारी सकाळी ७ वाजता केलेल्या नोंदीनुसार हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) आनंद विहार येथे २९५, आरके पुरम येथे २३०, पंजाबी बागमध्ये २४४ आणि आयटीओ येथे २६३ वर होता. नुकत्याच झालेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला असला तरी दिल्लीतील हवेची गुणवत्ता चिंतेची बाब आहे. कर्तव्यपथावरील स्थानिक रहिवाशांनी अजूनही श्वास घेण्यात काही समस्या येत असल्याची तक्रार केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in