लघुद्योगांनी डीआरडीओच्या संशोधनाचा लाभ घ्यावा; संरक्षण राज्यमंत्र्यांचे आवाहन

डीआरडीओच्या ज्ञानाचा आणि या संस्थेने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, खासगी उद्योग क्षेत्राने करून घेणे आवश्यक आहे.
लघुद्योगांनी डीआरडीओच्या संशोधनाचा लाभ घ्यावा; संरक्षण राज्यमंत्र्यांचे आवाहन

हैदराबाद : डीआरडीओच्या ज्ञानाचा आणि या संस्थेने विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, खासगी उद्योग क्षेत्राने करून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या देशात स्वावलंबी संरक्षण औद्योगिक परिसंस्थेची स्थापना शक्य होईल”. इतर राष्ट्रांना शस्त्रास्त्र प्रणाली निर्यात करण्यात डीआरडीओने जागतिक नेता म्हणून उदयास यावे, असे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी १४ जानेवारी २०१४ रोजी डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या हैदराबाद येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाला भेट दिली. यावेळी त्यांनी संशोधन केंद्र इमारतीमध्ये (आरसीआय) चालू असलेल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि संबंधित कार्यक्रमांचा आढावा घेतला.

आज संरक्षण क्षेत्र हे केवळ जमीन, समुद्र किंवा आकाशापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याने आता अवकाशालाही व्यापून टाकले आहे असेही त्यांनी नमूद केले. महासंचालक, क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली (डीजी,एमएसएस) यू राजा बाबू, यांनी संरक्षण राज्य मंत्री यांना विविध तांत्रिक विकास कार्याची विस्ताराने माहिती दिली. डीआरडीएल, एएसएल आणि आरसीआयच्या प्रयोगशाळा संचालकांनी संरक्षण राज्य मंत्र्यांना संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध तांत्रिक प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in