...तर मीच बुलडोझर आणतो - नितीन गडकरी

रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ हटवून प्रकल्प मार्गी लावावेत, अन्यथा आपण स्वत: बुलडोझर लावून अतिक्रमणे हटविण्याची व्यवस्था करू, असा सज्जद दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे दिला.
नितीन गडकरी
नितीन गडकरी संग्रहित छायाचित्र
Published on

वास्को : रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ हटवून प्रकल्प मार्गी लावावेत, अन्यथा आपण स्वत: बुलडोझर लावून अतिक्रमणे हटविण्याची व्यवस्था करू, असा सज्जद दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे दिला.

गडकरी यांनी मंगळवारी गोव्यातील वास्को येथे ४,२०० कोटींच्या सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यानिमित्ताने दक्षिण गोव्याला जोडणारे रस्ते आणि आधुनिक सुविधा प्रदान केल्या जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अतिक्रमणाविरोधात नाराजी व्यक्त केली.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत गडकरी म्हणाले, मी जेव्हा रस्त्याचे निरीक्षण करतो तेव्हा मला इथे सरकारी लोकांनीच अतिक्रमण केल्याचा संशय येतो. कारण रस्त्यांची रुंदी मला बरोबर वाटत नाही. रस्त्याचे काम करण्यापूर्वी त्याचे मोजमाप करा. जर कुणी अतिक्रमण केलेले असेल तर ते हटवा. जर ते अतिक्रमण हटविणार नसतील तर मला सांगा मी बुलडोझर लावून ते हटवतो, असे गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोव्यातील पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ५० वर्षात जितका विकास झाला नाही, तो आम्ही १४ वर्षांत करून दाखवला आहे. गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचा गोव्याला पुढची २५ वर्षे लाभ मिळणार आहे. तसेच झुआरी उड्डाणपूल टॉवरवर फिरते रेस्टॉरंट उभारण्याचे नियोजन लवकरच केले जाईल. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतील, असे ते म्हणाले.

गोव्याला अपघातमुक्त करा!

याशिवाय वारंवार अपघात होणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) कोणती आहेत, ते एकदा ठरवून अपघात कमी कसे होतील, याचा प्रयत्न करावा. गोव्याला प्रदूषण आणि अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गडकरी यांनी केबल स्टेड उड्डाणपुलाचेही उद्घाटन केले.

logo
marathi.freepressjournal.in