म्हणुन यापुढे भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा रशिया नाही करणार...

आतापर्यंत इंडियन ऑईलने रशियन कंपनीसोबत ६ महिने स्वस्तात तेल देण्याचा करार केला आहे.
 म्हणुन यापुढे भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा रशिया नाही करणार...
Published on

येत्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलचे दर वाढू शकतात. कारण रशियाने भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. बीपीसीएल व एचपीसीएल या कंपन्यांशी रशियाच्या रोसनेफ्ट कंपनीसोबत तेल खरेदीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, तेल कमी असल्याचे कारण देऊन रशियाने स्वस्तात तेल देण्याचा करार देण्यास नकार दिला.

आतापर्यंत इंडियन ऑईलने रशियन कंपनीसोबत ६ महिने स्वस्तात तेल देण्याचा करार केला आहे. या करारांतर्गत इंडियन ऑईल दर महा ६० लाख पिंप कच्चे तेल खरेदी करण्याचा पर्याय आहे. तसेच ३० लाख पिंप कच्चे तेल अधिक खरेदी करण्याचा पर्याय आहे.

सूत्रांनी सांगितले की, रोसनेफ्ट या रशियन कंपनीने दुसऱ्या ग्राहकांना तेलाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यामुळे रशियाकडे आता जास्त तेल नाही. त्यामुळे ते भारतीय कंपन्यांना तेल देऊ शकत नाही.

रशियाला भारताला स्वस्तात तेल देणार नाही. ही सवलत रशियाने मागे घेतली आहे. याचे कारण वाढलेला विमा हप्ता व वाहतुकीचा खर्च आहे. गेल्याच आठवड्यात युरोपियन महासंघाने रशियाच्या तेल वाहतुकीसाठी नवीन विमा कंत्राटांवर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय मरीन मार्केटमध्ये युरोपियन महासंघाचा दबदबा आहे. तेल वाहतुकीसाठी विमा नसल्याने इंडियन ऑईलवर परिणाम होईल. इंडियन ऑईल गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार, रॉसनेफ्टकडून तेल खरेदी करत आहेत. भारत रशियाकडून युरल्स तेल खरेदी करतो. एचपीसीएल व बीपीसीएलला रशियाकडून १० ते २० लाख पिंप तेल मिळू शकते.

logo
marathi.freepressjournal.in