सूर्यकिरणांमुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत; भारतात अनेक उड्डाणांवर परिणाम

भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपन्यांकडे असलेल्या ए३२० श्रेणीतील विमानांमध्ये काही तांत्रिक बिघाड आढळला आहे.
सूर्यकिरणांमुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत; भारतात अनेक उड्डाणांवर परिणाम
सूर्यकिरणांमुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत; भारतात अनेक उड्डाणांवर परिणामPhoto : X (@Turbinetraveler)
Published on

नवी दिल्ली : भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या शेकडो विमान उड्डाणांवर परिणाम होऊन हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकेल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपन्यांकडे असलेल्या ए३२० श्रेणीतील विमानांमध्ये काही तांत्रिक बिघाड आढळला आहे. फ्रान्सस्थित एअरबस या विमान कंपनीने सूर्याची तीव्र किरणे काही विमानांमधील फ्लाइट कंट्रोल सिस्टिमसाठी आवश्यक असलेला शकतात. डेटा खराब करू तसेच हा डेटा जर चुकीचा निघाला तर विमानाच्या कंट्रोलवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे.

एअरबस कंपनीने सांगितले की, सूर्याकडून येणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे फ्लाईट कंट्रोल सिस्टिमशी संबंधित काही महत्त्वपूर्ण डेटा करप्ट करू शकतो. त्यामुळे जगभरात ए३२० श्रेणीतील विमानांच्या उड्डाणांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. एअरबसने हा एक गंभीर तांत्रिक दोष असल्याचे म्हटले आहे. तर एअरबस ए३२० विमानांसाठी एक सॉफ्टवेअर फिक्सशी संबंधित अलर्ट मिळाल्यानंतर आम्ही सावधगिरी म्हणून काही पावले उचलली आहेत, असे एअर इंडिया एक्स्प्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सध्या भारतामध्ये ५६० हून अधिक ए३२० विमाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरात आहेत. तसेच त्यामधील सुमारे २०० ते २५० विमानांमध्ये त्वरित तपास आणि बदलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यातील काही विमानांमधील सॉफ्टवेअर बदलावा लागणार आहे. तर काहीमधील हार्डवेअर थेटपणे रिप्लेस केला जाणार आहे. यादरम्यान, विमानांना काही काळ थांबवाले लागणार आहे. त्यामुळे उड्डाणे उशिरा होण्याची किंवा ती रद्द होण्याचीही शक्यता आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (ईएएसए) इर्मजन्सी नोटिस प्रसिद्ध करून विमानांमध्ये फ्लाईट कंट्रोल सांभाळणारा एक चांगला ईएलएसी कॉम्प्युटर लावणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. हल्लीच एका ए३२० विमान ऑटोपायलट सुरू असताना विनाकमांड किंचित झुकल्याचे समोर आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ईएलएसी मॉड्युलमध्ये काही त्रुटी असल्याचे समोर आले होते. याबाबत एअरबसच्या प्रवक्त्याने सांगितले की, या तांत्रिक समस्येचा आणि त्याच्या दुरुस्तीचा परिणाम सुमारे ६ हजार विमानांवर होऊ शकतो.

भारतातील ३३८ विमानांवर अपडेट प्रक्रिया सुरू

जगभरातील ए३२० विमानांना उड्डाण नियंत्रणाच्या महत्त्वाच्या डेटावर परिणाम करणाऱ्या तीव्र सौर किरणोत्सर्गाच्या संभाव्य समस्येचे निराकरण करण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडची आवश्यकता असल्याचा अलर्ट एअरबसने शुक्रवारी जारी केला. यामध्ये भारतातील ३३८ विमानांचा समावेश आहे. त्यानुसार भारतातील विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड करणे सुरू आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीनुसार, भारतातील एकूण प्रभावित विमानांपैकी अर्ध्याहून अधिक विमानांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत डीजीसीएकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण ३३८ विमानांपैकी १८९ ए३२० विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड पूर्ण झाले आहे. तर सर्व प्रभावित विमानांचे सॉफ्टवेअर अपग्रेड ३० नोव्हेंबर रोजी, सकाळी ५:२९ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.

सूत्रांनी सांगितले की, उड्डाण नियंत्रणाशी संबंधित समस्येमुळे कोणतेही उड्डाण रद्द झालेले नाही. मात्र, प्रभावित विमानांसाठी सॉफ्टवेअर अपडेट केले जात असल्याने काही विमानांच्या उड्डाणांसाठी ६०-९० मिनिटांचा विलंब होत आहे. दरम्यान, शुक्रवारी, एअरबसने सांगितले होते की, तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे ए३२० विमानांच्या उड्डाण नियंत्रणांसाठीचा महत्त्वाचा डेटा खराब होऊ शकतो. त्यामुळे समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअर बदलांमुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, भारतात इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान वाहतूक कंपन्यांकडे ए३२० विमाने आहेत.

logo
marathi.freepressjournal.in