१ कोटी घरांवर सौर पॅनल लावणार

अयोध्यातील राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर दिल्लीत परतल्यानंतर मोदी यांनी ही योजना जाहीर केली.
१ कोटी घरांवर सौर पॅनल लावणार
@BJP4India

नवी दिल्ली : देशातील १ कोटी घरांवर सौर पॅनल लावण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अयोध्यातील राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर दिल्लीत परतल्यानंतर मोदी यांनी ही योजना जाहीर केली.

ते म्हणाले की, सूर्यवंशी भगवान श्रीराम यांच्याकडून भक्तांना कायमच ऊर्जा मिळते. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भारतीयांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा देणारी पॅनल लागली पाहिजेत, असा माझा संकल्प आहे. त्यामुळे १ कोटी घरांवर सौरऊर्जा लावण्याच्या पंतप्रधान सूर्योदय योजनेचा प्रारंभ केला जाणार आहे. यामुळे गरीब व मध्यम वर्गाचे वीज बिल कमी होईल. तसेच भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in