कॅनडासाठी काही व्हिसा आजपासून मिळणार

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अलिकडेच व्हिसा सेवा सुरू होण्याचे संकेत दिले होते
कॅनडासाठी काही व्हिसा आजपासून मिळणार

नवी दिल्ली : खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येनंतर झालेल्या तणावात भारताने कॅनडाची व्हिसा सेवा बंद केली होती. मात्र, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आणि कॅनडा सरकारने केलेल्या उपायोजना विचारात घेतल्यानंतर काही प्रकारची व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. २६ ऑक्टोबर पासून हे व्हिसा देणे सुरू करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार एंट्री व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडीकल व्हिसा, आणि कॉन्फरन्स व्हिसा या प्रकारचे व्हिसा २६ ऑक्टोबर पासून देण्यात येणार आहेत. भारताने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी पाठवल्यानंतर देखील काही मोजक्या प्रकारचे व्हिसा देण्यास सरकारने सुरुवात केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अलिकडेच व्हिसा सेवा सुरू होण्याचे संकेत दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in