सोनाली फोगाटची बलात्कार करुन हत्या; भाऊ रिंकू ढाकाचा आरोप

सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका हे हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूथनकला गावात राहतात.
सोनाली फोगाटची बलात्कार करुन हत्या; भाऊ रिंकू ढाकाचा आरोप

हरियाणातील भाजपनेत्या सोनाली फोगाटच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात आता त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा आणि त्यांना ब्लॅकमेल केले जात होते, असा आरोप सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे.

सोनालीचा लहान भाऊ रिंकू ढाका हे हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूथनकला गावात राहतात. त्यांनी आपल्या बहिणीचा पीए सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला तिच्या जेवणात मादक पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आणि व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच सोनालीची मालमत्ता हिसकावून राजकीय षड‌्यंत्र रचून तिची हत्या केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात रिंकूने गोवा पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. भूथनकला हे सोनालीचे मूळ गाव असून सोनालीचे आई-वडील, भाऊ आणि वहिनी दोघेही याच गावात राहतात. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “सोनाली फोगाटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलीस सखोल तपास करत आहेत. गोव्याचे डीजीपी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in