काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल ; सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल ; सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Soniya Gandhi) यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्याने त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची मिळत आहे. यापूर्वी देखील सोनिया गांधी यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात केले होते.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना तापाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी या नुकत्याच मुंबई झालेल्या इंडिया (INDIA)आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती. सोनिया गांधी यांना यापूर्वी मार्चमध्ये रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांना तापाची लक्षणे आढळली. त्यावेळी देखील त्यांना गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in