माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, आपले आगामी आत्मचरित्र हे राजकीय नाही तर वैयक्तिक स्वरूपाचे पुस्तक आहे, असे म्हटले आहे. ‘माझ्या कुटुंबातील सदस्यांचे चित्रण मी त्यांना ओळखत होते आणि त्यांच्यावर प्रेम करत होते म्हणून प्रामाणिकपणे केले आहे.
माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण
माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण
Published on: 

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, आपले आगामी आत्मचरित्र हे राजकीय नाही तर वैयक्तिक स्वरूपाचे पुस्तक आहे, असे म्हटले आहे. ‘माझ्या कुटुंबातील सदस्यांचे चित्रण मी त्यांना ओळखत होते आणि त्यांच्यावर प्रेम करत होते म्हणून प्रामाणिकपणे केले आहे. हा माझ्या प्रवासाचा आणि मी आपले घर मानलेल्या देशाचा माझ्या दृष्टिकोनातून मांडलेला वृत्तांत आहे’, असेही त्यांनी नमूद केले

एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी म्हणतात, माझ्या आयुष्यातील बहुतांश काळ मी माझे अंतर्मन स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले. दुःखद घटनांमुळे राजकारणात प्रवेश केल्यानंतरही शक्य तितकी वैयक्तिक गोपनीयता जपली. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने लिहिणे ही कल्पनाच मला अशक्य वाटत होती. मात्र, सार्वजनिक जीवनातील दैनंदिन धावपळीपासून दूर गेल्यानंतरच मला माझ्या आयुष्याकडे स्पष्टपणे पाहता आले, असे सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे.

भारत हाच माझा खरा देश

कठीण काळात पतीवरील प्रेम आणि भारताविषयीची आत्मीयता याच गोष्टींनी आपल्याला सावरण्याचे बळ दिले. भारत हाच आपला खरा देश असल्याची भावना निर्माण झाली. याच भावनेतून आणि कर्तव्याच्या जाणिवेतून आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, अशा शब्दात त्यांनी राजकारण प्रवेशामागील भूमिका स्पष्ट केली.

सासूबाई इंदिरा गांधी यांच्याशी घट्ट नाते

एका छोट्या इटालियन शहरातील १९ वर्षीय तरुणीची इंग्लंडमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याशी भेट झाली. या भेटीतून आपला नव्या देशात आणि नव्या कुटुंबात प्रवेश झाला. सासूबाई इंदिरा गांधी यांच्याशी घट्ट नाते निर्माण झाले आणि मुलांच्या संगोपनाचा प्रवास सुरू झाला, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी पुस्तकाच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)