नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह १४ जणांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नव्या संसद भवनात सदस्यांना शपथ दिली.
काँग्रेसचे नेते अजय माकन आणि सय्यद नासीर हुसेन, भाजप नेते आरपीएन सिंह, सामिक भट्टाचार्य, जदयूचे संजयकुमार झा, बीजेडीचे शुभाषिश खुंटिया आणि देबशिष सामंतराय, भाजपचे मदन राठोड यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. वायएसआरसीपीचे नेते गोल्ला बाबूराव, मेदा रघुनाथ रेड्डी आणि येरम वेंकट सुब्बा रेड्डी. बीआरएस नेते रवीचंद्र वडिराजू यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली.