नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषण वाढल्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या जयपूरला गेल्या आहेत.
सोनिया गांधी यांना यापूर्वी सिमला येथे नेण्यात आले होते. मात्र, तेथील कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना जयपूरमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार दौरा सोडून जयपूरमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा ते निवडणूक प्रचारसभेत रुजू झाले.सोनिया या अस्थमाच्या रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्ली सोडावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. येथे काही दिवस त्या जयपूरमध्येच राहणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.