सत्तेत असलेल्यांसाठी धर्मनिरपेक्षता आता निंदनीय

सोनिया गांधी यांची भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका
सत्तेत असलेल्यांसाठी धर्मनिरपेक्षता आता निंदनीय

तिरुवनंतपूरम : धर्मनिरपेक्ष हा शब्द आता सत्तेत असलेल्या लोकांकडून निंदनीय म्हणून वापरला जात आहे, परिणामी समाजात ध्रुवीकरण वाढले आहे. तर सत्तेत असणारे ते म्हणतात की, लोकशाहीसाठी आहेत, वचनबद्ध आहेत, परंतु त्याचवेळी ते सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी असलेल्या सुरक्षा उपायांना कमकुवत करत आहेत. असे सांगून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मनोरमा इयरबुक २०२४ साठी लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी हे घणाघाती आरोप केले आहेत.

त्या यात पुढे म्हणाल्या आहेत की, आपल्या देशाला सुसंवाद साधण्यासाठी मार्गदर्शित करणाऱ्या (रेल्वे मार्गाचे) मार्गाचे नुकसान होत आहे आणि त्याचे परिणाम आधीच दिसू लागले आहेत. समाजात ध्रुवीकरण वाढले आहे.

लोकशाही व धर्मनिरपेक्षता हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जणू रेल्वेच्या दोन रुळांप्रमाणे ते आहे. असे सांगून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या की, धर्मनिरपेक्षतेचे अनेक प्रकारे अर्थ लावले जाऊ शकते. परंतु भारतासाठी सर्वात संबंधित अर्थ महात्मा गांधींनी त्यांच्या प्रसिद्ध शब्द सर्वधर्मसमभावमध्ये मांडला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in