
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केली होती. याआधी सोनिया गांधी 8 जून रोजी ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला. जो 22 जुलै रोजी संपत आहे.
ईडीने राहुल गांधींची चार दिवस चौकशी केली. प्रियांका गांधीही राहुलसोबत ईडी कार्यालयात गेल्या होत्या. ईडीकडून राहुलच्या सुरू असलेल्या चौकशीला काँग्रेसने विरोध केला होता. खासदार राहुल गांधी यांना अशा प्रकारे त्रास देता येणार नाही, असे काँग्रेसने त्यावेळी म्हटले होते.