सोनिया गांधी लोकसभा लढणार नाहीत; आरोग्य समस्येमुळे माघार

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील मतदारांना एक भावनिक संदेश पाठवला आहे. २००४ पासून त्यांनी या मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.
सोनिया गांधी लोकसभा लढणार नाहीत;
आरोग्य समस्येमुळे माघार
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आरोग्याच्या समस्यांमुळे आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे गुरुवारी स्पष्ट केले. रायबरेली मतदारसंघातून मिळालेले जनतेचे प्रेम आणि पाठिंबा याबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील मतदारांना एक भावनिक संदेश पाठवला आहे. २००४ पासून त्यांनी या मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. आता मात्र वय आणि आरोग्य साथ देत नसल्यामुळे सोनिया यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. रायबरेलीकरांना उद्देशून सोनिया म्हणाल्या की, आज मी जे काही आहे, ते केवळ आपल्यामुळेच आहे. माझ्यावरील आपल्या विश्वासाचा मी नेहमीच आदर केला. पण, आता आरोग्य साथ देत नसून वयासोबत येणाऱ्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे पुढील लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही. या निर्णयानंतर मला आपली थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही. पण, माझे हृदय आणि मन नेहमीच तुमच्या सोबत राहील. भविष्यात देखील आपण मी आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी असेच खंबीरपणे उभे राहाल याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in