सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली,दिल्लीच्या रुग्णालयात केले दाखल

प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली,दिल्लीच्या रुग्णालयात केले दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याचा अहवाल अद्याप निगेटिव्ह आला नाही. हळूहळू त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत होती; मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २३ जून रोजी नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

७५ वर्षीय सोनिया गांधी यांना २ जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती; पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली. “सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती; पण प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले,” असे सुरजेवाला यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in