सोरेन यांना अटक;मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : चंपाई सोरेन नवे नेते

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या 'ईडी' चौकशीच्या नाट्यात बुधवारी अनेक चढउतार येत अखेर रात्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
सोरेन यांना अटक;मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : चंपाई सोरेन नवे नेते
Published on

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या 'ईडी' चौकशीच्या नाट्यात बुधवारी अनेक चढउतार येत अखेर रात्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. ईडीच्या चौकशीवेळी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्या अटकपत्रावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीचे अधिकारी त्यांना राज्यपालांकडे घेऊन गेले. तेथे सोरेन यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर ईडीचे अधिकारी सोरेन यांना रांचीतील ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले. तेथे सोरेन यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in