नवी दिल्लीः दोन स्टार्टअप्स 'पिक्सेल स्पेस' आणि 'ध्रुवा स्पेस' यांनी कॅलिफोर्नियातील व्हॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून बुधवारी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकटच्या सहाय्याने आपले उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. 'पिक्सेल'च्या तीन फायरफ्लाय उपग्रहांच्या प्रक्षेपणाने पृथ्वीचे अधिक जवळून आणि स्पष्ट निरीक्षण करता येणार आहे.
हैदराबादस्थित ध्रुवा स्पेसने आपला पहिला व्यावसायिक 'लीप-१' उपग्रह प्रक्षेपित केला असून यात ऑस्ट्रेलियातील अकुला टेक आणि एस्पर सॅटेलाइट्स या कंपन्यांचे पेलोड्स आहेत. हा उपग्रह ध्रुवा स्पेसने दोन ऑस्ट्रेलियन कंपन्यांसाठी केलेला पहिला "होस्टेड पेलोड मिशन" आहे.