जम्मू-काश्मीरमधील चकमकीत स्पेशल फोर्सेसचा अधिकारी शहीद; विशेष दलाचे ३ जवान जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या जबरवान विभागात, तर दुसरी चकमक किश्तवाड येथे चकमक सुरू आहे. किश्तवाड येथे चकमकीत २ पॅरा स्पेशल फोर्सेसचे ज्युनियर कमिशन ऑफिसर (जेसीओ) राकेश कुमार शहीद झाले असून विशेष दलाचे तीन जवान जखमी झाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या जबरवान विभागात, तर दुसरी चकमक किश्तवाड येथे चकमक सुरू आहे. किश्तवाड येथे चकमकीत २ पॅरा स्पेशल फोर्सेसचे ज्युनियर कमिशन ऑफिसर (जेसीओ) राकेश कुमार शहीद झाले असून विशेष दलाचे तीन जवान जखमी झाले.

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, किश्तवाड येथे काश्मीर टायगर्स ग्रुपचे दहशतवादी लपले आहे. याच दहशतवाद्यांनी दोन ग्राम संरक्षण दलाच्या जवानांची हत्या केली होती.

सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये गेल्या १८ तासांपासून सुरू असलेली ही तिसरी चकमक आहे. नोव्हेंबरच्या १० दिवसांतील ही आठवी चकमक आहे.

बारामुल्ला येथील सोपोर येथे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुरक्षा दलांनी चकमकीत दहशतवाद्याला ठार केले. ८ नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. ही चकमक रामपूरच्या जंगलात झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in