जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेत बुधवारी मंजुर करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी ठरावाच्या प्रती फाडल्या आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध घोषणाबाजी केली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
पीटीआय
Published on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेत बुधवारी मंजुर करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी ठरावाच्या प्रती फाडल्या आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध घोषणाबाजी केली.

भाजपच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याने कामकाजामध्ये सातत्याने व्यत्यय येत होता. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले. विशेष दर्जा एकतर्फी हटविण्यात आल्याबद्दल ठरावामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. या ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले, कोणतीही चर्चा झाली नाही.

ठराव पारित करण्यात आल्याने निवडणूक जाहीरनाम्यातील एक आश्वासन पूर्ण केल्याचे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे, तर विधानसभेने आपले कर्तव्य पार पाडल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स आणि माकपने आवाजी मतदानाच्या वेळी ठरावाला पाटिंबा दिला.

विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ २०१९मध्ये मोदी सरकारने केले रद्द

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१९ मध्ये रद्द केले आणि जम्मू-काश्मीर या राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते.

logo
marathi.freepressjournal.in