बंगळुरूच्या आकाशातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक होणार मंत्रमुग्ध!! Aero India 2025 ची सुरुवात

बंगळुरू येथे आज (दि.10) आशिया खंडातील सर्वात मोठा एअर शो Aero India 2025 (एरो इंडिया 2025) ची सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येलहंका येथे या शोचे उद्घाटन केले. हा शो भारताच्या अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने 'ऐतिहासिक टप्पा' ठरेल, असे त्यांनी रविवारी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले होते.
बंगळुरूच्या आकाशातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक होणार मंत्रमुग्ध!! Aero India 2025 ची सुरुवात
बंगळुरूच्या आकाशातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक होणार मंत्रमुग्ध!! Aero India 2025 ची सुरुवातKarnataka Weather @Bnglrweatherman
Published on

बंगळुरू येथे आज (दि.10) आशिया खंडातील सर्वात मोठा एअर शो Aero India 2025 (एरो इंडिया 2025) ची सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येलहंका येथे या शोचे उद्घाटन केले. हा शो भारताच्या अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने 'ऐतिहासिक टप्पा' ठरेल, असे त्यांनी रविवारी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले होते.

उद्घाटनप्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले, ''संपूर्ण भारतासाठी हा एक मोठा प्रसंग आहे. सध्या महाकुंभ सुरू आहे, जगभरातील लोक प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करत आहेत, एरो इंडियासोबत हा आणखी एक महाकुंभ आहे. पंतप्रधान मोदींचे 'विकास भी, विरासत भी' चे घोषवाक्य आज साकार होत आहे. अशा प्रकारचा योगायोग फक्त भारतातच शक्य आहे.''

एरो इंडिया हा आशिया खंडातील सर्वात मोठा द्वैवार्षिक हवाई शो आहे. एरो इंडिया 2025 हा शो एकूण 42000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. 150 परदेशी कंपन्यांसह 900 हून अधिक प्रदर्शकांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. हा शो 14 फेब्रवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पाच दिवसांच्या या शोमध्ये पहिले तीन दिवस व्यावसायिकांसाठी असेल तर शेवटचे दोन दिवस सर्व सामांन्यांसाठी खुले असणार आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा एरो इंडिया शो

एरो इंडिया 2025 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एरो इंडिया असेल. प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या विमानांमध्ये रशियाचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने, अमेरिकेचे SU-57 आणि F-35, ब्राझीलचे KC-135 स्ट्रॅटोटँकर, B-1B लान्सर आणि मल्टी-मिशन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट KC-390 मिलेनियम यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in