ताशी २५० किमी वेगानं धावणार भारतीय रेल्वे! 'ही' ८ डब्यांची ट्रेन Vande Bharat ला टाकणार मागे...

भारतीय रेल्वे आगामी काळात अशी ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे, जिचा वेग ताशी २५० किलोमीटर असेल.
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेfpj

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, भारतीय रेल्वे आगामी काळात अशी ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे, जिचा वेग ताशी २५० किलोमीटर असेल. हा वेग जवळपास बुलेट ट्रेनसारखा असेल. अशा परिस्थितीत, आपण अंदाज लावू शकता की आगामी काळात रेल्वेनं प्रवास करण्याची वेळ खूप कमी होईल.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला (ICF) देशातील पहिली ट्रेन बनवण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही ट्रेन ताशी २५० किलोमीटर वेगाने धावू शकेल. ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. या ट्रेनमुळं प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे.

सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून वंदे भारतची ओळख आहे. वंदे भारत ट्रेन ताशी १८० किलोमीटर वेगाने धावू शकतात. पण आता रेल्वेनं आणखी वेगवान ट्रेन चालवण्याची तयारी सुरु केली आहे.देशातील सर्वात प्रसिद्ध रेल कोच बनवण्याच्या कारखान्यांपैकी एक म्हणून चेन्नईमधील ICFची (इंटिग्रल कोच फॅक्टरी) ओळख आहे. या फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनदेखील बनवली जाते. आता इथं बनवल्या जाणाऱ्या नव्या ट्रेन्स तंत्रज्ञान आणि गुणवत्तेच्या बाबतीत वंदे भारत तसेच बुलेट ट्रेन्सइतक्याच चांगल्या असतील.

भारतातील बहुतेक गाड्यांचा वेग सुमारे १५० किमी प्रतितास आहे. मात्र आयसीएफने वंदे भारत ट्रेन बनवून सर्वांनाच चकित केलं. ही ट्रेन ताशी १८० किमी वेगानं धावू शकते. त्यामुळं प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो.

आता रेल्वे मंत्रालयानं चेन्नईच्या आयसीएफला नवी ऑर्डर दिली आहे. या आदेशानुसार, ICF ला एका वर्षात ताशी २५० किमी वेगाने धावू शकणारे दोन ट्रेन संच तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ICF वर आता २५० किमी/ताशी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत वंदे भारत ट्रेन बनवताना जे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ICF नवीन हाय-स्पीड ट्रेन बनवणार आहे.

या नवीन गाड्यांना ८ डबे असतील आणि त्यांच्या निर्मितीचे काम लवकरच ICF कारखान्यात सुरू होणार आहे. आतापर्यंत बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन मानली जाते आणि भारतीय रेल्वेच्या या प्रकल्पाचा उद्देश तितकीच वेगवान ट्रेन बनवणे हे आहे.

logo
marathi.freepressjournal.in