‘सीआयएसएफ’ जवानाला थप्पड मारली; SpiceJet च्या महिला कर्मचारीला अटक, Video झाला व्हायरल

जयपूर विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी तैनात असलेल्या ‘सीआयएसएफ’च्या ‘एएसआय’ला स्पाइसजेट एअरलाइन्सच्या महिला कर्मचारीनी थप्पड मारली.
‘सीआयएसएफ’ जवानाला थप्पड मारली; SpiceJet च्या महिला कर्मचारीला अटक, Video झाला व्हायरल
Published on

जयपूर : जयपूर विमानतळावर स्पाइसजेट एअरलाइनच्या महिला कर्मचाऱ्याने ‘सीआयएसएफ’ जवानाला थप्पड मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. ‘सीआयएसएफ’ जवानाने सदर महिला कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याने महिला कर्मचाऱ्यावर थप्पड मारल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सदर महिला कर्मचाऱ्यास अटक केली आहे.

जयपूर विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी तैनात असलेल्या ‘सीआयएसएफ’च्या ‘एएसआय’ला स्पाइसजेट एअरलाइन्सच्या महिला कर्मचारीनी थप्पड मारली. विमान कंपनीच्या फूड सुपरवायझर अनुराधा राणी या पहाटे चारच्या सुमारास वाहन गेटमधून अन्य कर्मचाऱ्यांसह विमानतळावर प्रवेश करत होत्या. कर्मचाऱ्याला तो गेट वापरण्याची परवानगी नसल्याने सहायक उपनिरीक्षक गिरीराज प्रसाद यांनी त्यांना थांबवले असता हा प्रकार घडला.

logo
marathi.freepressjournal.in