Rishabh Pant Car Accident : स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

दिल्लीहून उत्तराखंडमधील रुडकी येथील त्याच्या घरी येत असताना हा अपघात झाला.
Rishabh Pant Car Accident : स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात (Rishabh Pant Car Accident) झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत जखमी झाला आहे. ऋषभवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीहून परतत असताना हम्मादपूरजवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभ पंतच्या कारला आग लागली, त्यानंतर उपस्थित लोकांनी त्याला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वतः कार चालवत होता. गाडी चालवताना झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पंतला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्लीहून उत्तराखंडमधील रुडकी येथील त्याच्या घरी येत असताना हा अपघात झाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in