आता बेरोजगार तरुणांना मिळणार भत्ता; 'या' राज्याने केली मोठी घोषणा

एकीकडे देशात बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना एका राज्याने केली मोठी घोषणा
आता बेरोजगार तरुणांना मिळणार भत्ता; 'या' राज्याने केली मोठी घोषणा

एकीकडे काँग्रेससह विरोधीपक्ष सत्ताधारी भाजपवर बेरोजगारीवरून टीका करत आहेत. तर दुसरीकडे, छत्तीसगड सरकारने बेरोजगारीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडच्या भूपेन बघेल सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना महिन्याला २,५०० रुपयांचा भत्ता देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, अंगणवाडी सेविकांना महिन्याला तब्बल १० हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्याचा २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. बेरोजगारी भत्ता देण्याबाबत केलेल्या घोषणेमध्ये म्हंटले आहे की, १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुणांना हा भत्ता मिळणार आहे. तसेच, ज्या तरुणांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे २.५० लाखांहून खाली असेल, तेच तरुण यासाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान, गेली अनेक वर्ष भारतामध्ये शिक्षण घेतलेल्या पण नोकरी नसलेल्या तरुणांना भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत होती.

logo
marathi.freepressjournal.in