वंदे भारत ट्रेनवर दगडफेक ; प्रवासी घाबरल्याने डब्यातच गोंधळ

कर्नाटक, बंगालनंतर उत्तर प्रदेशात देखील वंदे भारत ट्रेनवर दगड फेकल्याची घटना घडली आहे. गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे
वंदे भारत ट्रेनवर दगडफेक ; प्रवासी घाबरल्याने डब्यातच गोंधळ

वंदे भारत ट्रेनवर अनेकदा दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. आता कर्नाटक, बंगालनंतर उत्तर प्रदेशात देखील वंदे भारत ट्रेनवर दगड फेकल्याची घटना घडली आहे. गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत गाडीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

गोरखपूरहुन लखनौला जाणऱ्या वंदे भारत ट्रेनवर काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत कोच क्रमांक C1,C3 आणि एक्झिक्यटिव्ह कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. ट्रेनवर अचाकन दगडफेक झाल्याने ट्रेनमधील प्रवासी हे घाबरले आणि डब्यात एकज गोंधळ उडाला. या दगडफेकीत एकाही प्रवाशाला इजा किंवा दुखापत झाली नाही.

७ जुलै २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. ही उत्तर प्रदेशात धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, तिकीट दरामुळे या ट्रेनच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ देखील फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यात आता ट्रेनवर दगडफेकी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थिती झालं आहे. प्रवाशांनी जास्त तिकीट दरामुळे ट्रेनच्या प्रवासाकडे पाठ फिरवल्याने रेल्वे बोर्डाने वंदे भारत्या तिकीट दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in