"आमच्यावर पाकिस्तानी असल्याचा संशय घेण बंद करा" फारुक अब्दुल्ला आक्रमक

यावेळी त्यांनी हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा, तुम्हाला कोणी अडवलं आहे, आम्ही तर कधीही अडवलेलं नाही, असंही ते म्हणाले.
"आमच्यावर पाकिस्तानी असल्याचा संशय घेण बंद करा" फारुक अब्दुल्ला आक्रमक

संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आनला आहरे. या प्रस्तावावर सलग दुसऱ्या दिवशी चर्चा केली केली. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा, असं सांगत आपला संताप व्यक्त केला.

यावेळी बोलताना फारुक अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकार काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याचा दावा करत आहे, मात्र, तेथील परिस्थिती काही वेगळी असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तान बाबत बोलताना ते म्हणाले की, तुमचा विश्वास असो वा नसो तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा. तुम्हाला कोणीही अडवलेले नाही.आम्ही त्या तर कधीच थांबवलेलं नाही. असं बोलताना, आम्ही पाकिस्तानी असल्याचा संशय घेऊ नका. किती दिवस हा संशय घ्याल. आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. आम्ही देशासोबत होतो आणि कायम देशासोबत कायम उभा राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी वक्त केला.

पंतप्रधान मोदींविषयी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींवर देशाची जबाबदारी आहे. त्यांच्यावर केवळ हिंदुंचीच नव्हे तर देशातील मुस्लिम, ख्रिश्चन आणि शिख यांचीही दबाबदारी आहे. पंतप्रधान हे भारताचं नेतृत्व करतात. ते १४० कोटींचं नेतृत्व करतात. असं देखील अब्दुल्ला म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in