अभिनेता राजकुमार राव बनणार निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' ; भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठी जबाबदारी

२६ ऑक्टोंबर २०२३ रोजी राजकुमार रावची भारतीय निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
अभिनेता राजकुमार राव बनणार निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' ; भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठी जबाबदारी

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी राजकुमार रावची भारतीय निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकुमार राववर खास जबाबदारी सोपवण्यात येणार आगहे. नॅशनल आयकॉन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या २६ ऑक्टोंबरला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

भारतातील पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर आता भारतीय निवडणुक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील पाच राज्यात १६१ दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीत मतदान करतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली होती. आता अभिनेता राजकुमार राव विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करताना दिसून येणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेला १०० टक्के देणाऱ्या राजकुमार राववर आता नवीज जबाबदारी दिली गेली आहे.

नॅशनल आयकॉनची नेमणूक का केली जाते?

नॅशनल आयकॉन मतदारांना मतदानाबाबत जागरूक करतात. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त नागरिक मतदान करतात. राजकुमार रावच्याआधी ऑगस्टमहिन्यात निवडणूक आयोगाने भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवलं होतं. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावं अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. तरुण मंडळींवर त्यांचा फोकस आहे. त्यामुळे आता नॅशनल आयकॉन म्हणून राजकुमार रावची नेमणूक करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निवडणूक आयोग एखाद्या व्यक्तीची आपला राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करतात तेव्हा त्या सेलिब्रिटीला निवडणूक आयोगासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी लागते. हा करार तीन वर्षांसाठीचा असतो. नियुक्ती करण्यात आलेल्या सेलिब्रिटीला जाहिरातींद्वारे, तसंच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा इतर कार्यक्रमांद्वारे लोकांना मतदानाविषयी जागरुक करावं लागतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in