भारताकडून कॅनडावर जोरदार हल्लाबोल, पत्रकार परिषद घेत म्हणाले...
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडाला चांगलंच धारेवर धरलं.
कॅनडाच्या भूमीवरील दहशतवादी कारवायांबाबत आम्ही त्यांच्याशी अत्यंत विशिष्ट माहिती शेअर केली आहे. पण कॅनडाने भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केली नाही. कॅनडा हे दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले असून त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे, असं बागची यांनी यांनी कॅनडाला सुनावलं.
बागची पुढे म्हणाले की, कॅनडाची व्हिसा सेवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित काहील. कॅनडा सरकारचं सर्व आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचं स्पष्टपणे दिसत आहेत. भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर न करण्याने त्यारर शिक्कामोर्तब होत आहे. या प्रकरणातील विशिष्ट माहितीबद्दल जागरुक राहू इच्छितो. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कॅनडा आणि पाकिस्तानकडून आर्थिक मदत आणि पाठबळ असलेल्या दहशतवाद, यावर तडजोड होणं शक्य नाही.
कॅनडातील व्हिसा सेवा बंद करण्याच्या निर्णयावर देखील बागची यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या कॅनडातील उच्चायुक्तालये आणि वाणिज्य दूतावासांना भेडसावणाऱ्या धोक्यांची आम्हाला जाणीव आहे. त्यांचे कामकाज विस्कळीत झाल्याने आमचे उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद आहेत. कारण ते प्रभावीपणे कार्य करण्यास अक्षम आहेत. असं बागची म्हणाले.