सेवा क्षेत्राचा साडेतेरा वर्षांचा उच्चांक; मजबूत मागणी: मार्चमध्ये सेवा पीएमआय ६१.२

स्पर्धात्मक दबावांबद्दल चिंता असूनही, अनुकूल कल सुरू राहण्याची अपेक्षा आहे. इनपूट खर्च जलद दराने वाढला असताना, सेवा प्रदाते उच्च उत्पादन किमती आकारून नफा राखण्यात सक्षम आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
सेवा क्षेत्राचा साडेतेरा वर्षांचा उच्चांक; मजबूत मागणी: मार्चमध्ये सेवा पीएमआय ६१.२
Published on

नवी दिल्ली : मजबूत मागणीमुळे मार्चमध्ये देशाच्या सेवा क्षेत्राचा वाढीचा दर साडेतेरा वर्षांतील सर्वात मजबूत राहिला. एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ॲक्टिव्हिटी इंडेक्स (सेवा पीएमआय) फेब्रुवारीमधील ६०.६ वरून मार्चमध्ये ६१.२ पर्यंत वाढला.

अहवालात म्हटले आहे की, भारतातील सेवा पीएमआय फेब्रुवारीमध्ये किंचित घसरल्यानंतर मार्चमध्ये वाढला आणि मजबूत मागणीमुळे विक्री आणि व्यावसायिक उलाढाल वाढली. सेवा प्रदात्यांनी ऑगस्ट २०२३ पासून जलद गतीने भरती वाढवली. कारण ते उत्पादन क्षमता वाढवण्याचा विचार करत आहेत, असे एचएसबीसीचे अर्थशास्त्रज्ञ इनेस लॅम म्हणाले.

सर्वेक्षणानुसार, विक्रीत वाढ होण्याची मुख्य कारणे म्हणजे मागणी उत्तम राहिली आहे. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ झाली. कंपन्यांनी मार्चमध्ये नवीन ऑर्डर घेण्यामध्ये लक्षणीय सुधारणा दर्शविली. जून २०१० पासून वाढीचा दर सर्वोत्तम राहिला आहे.

स्पर्धात्मक दबावांबद्दल चिंता असूनही, अनुकूल कल सुरू राहण्याची अपेक्षा आहे. इनपूट खर्च जलद दराने वाढला असताना, सेवा प्रदाते उच्च उत्पादन किमती आकारून नफा राखण्यात सक्षम आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. पुढे जाऊन, सेवा क्षेत्रातील कंपन्यांना मागणीचा कल अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे आणि मार्केटिंगचे प्रयत्न सुरू राहतील. मागणीकडे वाढीची संधी म्हणून पाहिले जाते. तथापि, स्पर्धात्मक दबावांबद्दल काही प्रमाणात चिंता आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

दरम्यान, एचएसबीसी इंडिया कंपोझिट पीएमआय आऊटपूट इंडेक्स फेब्रुवारीमध्ये ६०.६ वरून मार्चमध्ये ६१.८ वर पोहोचला. त्यामुळे गेल्या साडेतेरा वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची ही आकडेवारी ठरली आहे. संमिश्र पीएमआय निर्देशांक हा तुलनात्मक उत्पादन आणि सेवा पीएमआय निर्देशांकांची भारित सरासरी आहे. अधिकृत जीडीपी आकड्यांनुसार, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांची स्थिती त्यातून प्रतिबिंबित होते. मार्च डेटाने संपूर्ण भारतातील एकूण उत्पादनात तीव्र वाढ दर्शविली, कारण दोन्ही वस्तू उत्पादक आणि सेवा प्रदाते यांनी वाढ नोंदवली.

पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) च्या भाषेत, ५० च्या वरचा निर्देशांक विस्तार दर्शवतो, तर ५० च्या खाली आकुंचन दर्शवतो. एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय हा एस ॲण्ड पी ग्लोबलने सुमारे ४०० सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या पॅनेलला पाठवलेल्या प्रश्नावलीच्या प्रतिसादातून संकलित केले आहे.

मागणी वाढल्याने विक्री आणि व्यवसायात वाढ

सप्टेंबर २०१४ पासून सेवा क्षेत्राची वाढ कायम राहिल्याने नवीन निर्यात व्यवसाय जलद गतीने वाढला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व या देशांतून लाभ झाल्याचे सांगितले. सेवा कंपन्यांनी सूचित केले की नवीन व्यवसायाच्या वाढीमुळे त्यांच्या क्षमतेवर ताण आला आहे. या कारणास्तव सेवा पुरवठादारांनी मार्चमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती केली.

logo
marathi.freepressjournal.in