भारतातील सेवा क्षेत्रात ऑगस्टमध्ये जोरदार वाढ

एका मासिक सर्वेक्षणानुसार, मागणीत सुधारणा आणि उत्तम रोजगारनिर्मिती यामुळे हे घडले आहे
भारतातील सेवा क्षेत्रात ऑगस्टमध्ये जोरदार वाढ

ऑगस्ट महिन्यात भारतातील सेवा क्षेत्रातील व्यवहारांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. यंदा ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्राच्या नवीन व्यवसायात जोरदार वाढ झाली आहे. एका मासिक सर्वेक्षणानुसार, मागणीत सुधारणा आणि उत्तम रोजगारनिर्मिती यामुळे हे घडले आहे.

सर्वेक्षणानुसार, हंगामी समायोजित एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय व्यवसाय व्यवहार निर्देशांक ऑगस्टमध्ये ५७.२वर पोहोचला. जुलैमध्ये हा निर्देशांक ५५.५ इतका गेल्या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता.

या कालावधीत व्यावसायिक व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि रोजगार आघाडीवर १४ वर्षांतील सर्वात वेगवान वाढ झाली. ऑगस्टमध्ये सलग १३व्या महिन्यात सेवा क्षेत्रातील सुधारणा झाला. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)मधील ५०च्या वर स्कोअर सेवा क्षेत्रातील विस्तार दर्शवतो, तर ५० च्या खाली स्कोअर आकुंचन दर्शवतो. सेवा क्षेत्राच्या विस्ताराबाबत, एस ॲण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचे संयुक्त संचालक पॉलियाना डी लिमा म्हणाले, “नवीन व्यवसायात वाढ झाल्यामुळे सुधारणांना वेग आला आणि कंपन्यांना कोविड महामारीशी संबंधित निर्बंध हटवल्याचा आणि विपणन प्रयत्नांचा फायदा होत आहे.” मजबूत विक्री आणि चांगल्या वाढीच्या अंदाजांमुळे सेवा क्षेत्रातील भरतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रोजगारनिर्मितीचा दर १४ वर्षांतील सर्वात मजबूत झाला आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in