शेअर बाजारात जोरदार वाढ ;आयटी शेअर्स चमकले

शुक्रवारच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये दिसून आली
शेअर बाजारात जोरदार वाढ ;आयटी शेअर्स चमकले

मुंबई : शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी आली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १७८ अंकांनी वाढून ७२०२६ पातळीवर बंद झाला. निफ्टीही दिवसाच्या २१६२९ च्या नीचांकीवरून सावरला आणि २१७१० पातळीवर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी शेअर्समध्ये झाली.

शुक्रवारच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये दिसून आली. याशिवाय ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल आणि गॅस सेक्टर्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल, आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १८ शेअर्स वाढीसह आणि १२ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २५ शेअर्स वाढीसह आणि २५ शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी पोर्ट्स, टीसीएस, एलएनटी आणि एलटीआय माइंड ट्रीचे शेअर्स वाढीसह बंद झाले तर ब्रिटानिया, यूपीएल, नेस्ले आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स घसरले. शुक्रवारी शेअर बाजाराच्या व्यवहारात नेस्ले, बीसीएल इंडस्ट्रीज, कम्बाऊंड केमिकल आणि कजारिया सिरॅमिक्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर बंधन बँक आणि आशानिषा इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

शेअर बाजारात ब्रँड कॉन्सेप्ट, एक्साइड, जिओ फायनान्शिअल, ग्लोबस स्पिरिट, आयसीआयसीआय बँक, स्टोव्ह क्राफ्ट, पटेल इंजिनिअरिंग, कामधेनू लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले तर एचडीएफसी लाईफ, महिंद्रा अँड महिंद्रा, युनिपार्ट्स, टाटा मोटर्स, देवयानी इंटरनॅशनल आणि ओम इन्फ्राचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसभरात एकण ३९३६ कंपन्यांच्या शेअरचे व्यवहार झाले. पैकी २२२३ कंपन्यांच्या शेअरचे भाव उसळले, १६१२ कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले तर १०१ कंपन्यांच्या शेअरचे भाव अचल राहिले. जागतिक स्तरावर युरोपमधील लंडन, जर्मनी व फ्रान्स या तिन्ही प्रमुख शेअर बाजारात शुक्रवारी एक टक्क्यापर्यंत घसरण झाली.

logo
marathi.freepressjournal.in