आयआयटी-बनारसमध्ये बंदुकीच्या धाकाने विद्यार्थिनीचे कपडे उतरवले ;संतप्त विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

पंतप्रधानांच्या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षेवर कँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आयआयटी-बनारसमध्ये बंदुकीच्या धाकाने विद्यार्थिनीचे कपडे उतरवले ;संतप्त विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन

बनारस : आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींवर अत्याचार वाढत असल्याच्या घटना उघड होत आहेत. या विद्यापीठात मित्रांसोबत फिरणाऱ्या विद्यार्थिनीला बंदुकीचा धाक दाखवून तिचे कपडे उतरवण्याचा भयानक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजपुताना हॉस्टेलवर पोहोचून निदर्शने केली. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बॅनर व पोस्टर घेऊन विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

या आंदोलनानंतर पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाचे दरवाजे रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयआयटी-बनारस हिंदू विद्यापीठाच्या संचालकांचाही आंदोलक विद्यार्थ्यांनी निषेध केला. तसेच बाहेरील व्यक्तींना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षेवर कँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातील शिक्षणसंस्थेत विद्यार्थिनी बिनधास्तपणे फिरू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. आयआयटी बनारस हिंदू विश्वविद्यालय व आयआयटीच्या उच्चशिक्षण संस्था सुरक्षित नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in