'या' कारणाने उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा, कारण वाचून बसेल धक्का...

निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य विभाग यांच्याकडे पाठवला आहे
'या' कारणाने उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा, कारण वाचून बसेल धक्का...

सध्या मध्य प्रदेशातील छतपूर येथील उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा आहे. रजा न मिळाल्याने संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य विभाग यांच्याकडे पाठवला आहे. बांगरे यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसंच २५ जून रोजी त्यांच्या गृहप्रवेशासाठी रजा हवी होती. सरकारने त्यांची परवानगी नाकारल्याने त्यांनी थेट राजीनामा दिला आहे.

सुट्टी न मिळाल्याने राजीनामा दिल्याने निशा बांगरे या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांनी त्यांच्या या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं आहे. २५ जून रोजी त्यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचं आहे. त्याठिकाणी त्यांचे काही पाहुणे येणार असल्याचं त्यांनी सांगतलं. तसंच सर्वधर्म शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोन वेळा परवानगी मागितली होती. पण त्यांना परवानगी न मिळाल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तसंच मुलभूत अधिकारांचं उल्लंघन झाले. यावेळी त्यांना त्यांच्या मुलभूत अधिकार मिळत नसल्याने त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असं वाटलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच त्यांनी सरकार एक पत्र देखील लिहिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in