
भारतीय नौदलाच्या ‘वागीर’ पाणबुडीच्या समुद्रात चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचण्या केल्यानंतर पुढील वर्षी ती नौदलात सामील होणार आहे.
ही पाणबुडी जहाजविरोधी क्षेपणास्त्र व टार्पेडोने सक्षम आहे. ही पाणबुडी शत्रूच्या रडारवर दिसत नाही. या पाणबुडीचे २० एप्रिल २०२२ मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून अनावरण करण्यात आले.
वागीरची वैशिष्टये
ही पाणबुडी युद्धात काम करू शकते. हेरगिरी करणे, पाणसुरुंग बसवणे, विशिष्ट भागात टेहळणी करणे आदी कामे ही करू शकते. ही पाणबुडी २२१ फुट लांब असून २१ मीटर उंच आहे. ही पाणबुडी पाण्यावरून २० किमी प्रति तास व पाण्याच्या आत ४० किमी प्रति वेगाने चालू शकते.