इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; १०० वे मिशन फत्ते

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) श्रीहरिकोटा येथून ‘जीएसएलव्ही-एफ १५’ च्या सहाय्याने ‘एनव्हीएस-०२’ या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
इस्त्रोच्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; १०० वे मिशन फत्ते
एक्स @isro
Published on

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) श्रीहरिकोटा येथून ‘जीएसएलव्ही-एफ १५’ च्या सहाय्याने ‘एनव्हीएस-०२’ या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. विशेष म्हणजे इस्त्रोचे हे १०० वे मिशन होते.

सकाळी ६.२३ वाजता ‘जीएसएलव्ही-एफ१५’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोचे नवीन अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वाखाली हे पहिलेच मिशन पार पडले.

स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनसोबत ‘जीएसएलव्ही’ने १७ व्या उड्डाणात ‘एनव्हीएस-०२’ चे प्रक्षेपण केले. हा उपग्रह ‘नाविक’ श्रृंखलेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय उपखंडासोबतच भारतीय भूभागापासून १५०० किमी अंतरावरील परिस्थितीची योग्य माहिती हा उपग्रह वापरकर्त्यांना देणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या मिशनबद्दल इस्त्रोचे अभिनंदन केले. श्रीहरीकोटाहून १०० वे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्त्रोचे अभिनंदन. यामुळे भारताचे नाव जगात उज्ज्वल झाले आहे. विक्रम साराभाई, सतीश धवन आणि अन्य लोकांनी केलेल्या छोट्या सुरुवातीपासून आजपर्यंतचा प्रवास लक्षणीय आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in