नौदलाच्या ‘के-४’ बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाच्या ‘के-४’ बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी अणुपाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून करण्यात आली. ही पाणबुडी २०१७ मध्ये नौदलात सामील झाली होती.
नौदलाच्या ‘के-४’ बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
एक्स
Published on

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ‘के-४’ बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी अणुपाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून करण्यात आली. ही पाणबुडी २०१७ मध्ये नौदलात सामील झाली होती.

‘अरिघात’ ही आण्विक पाणबुडी आहे. या पाणबुडीचे वजन ६ हजार टन आहे. ‘के-४’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किमी आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी पश्चिम बंगालच्या उपसागरात करण्यात आली. ही चाचणी भारताच्या संरक्षण क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. भारताची आण्विक प्रतिकारशक्ती वाढवणे आदींचा यामागे उद्देश आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ‘आयएनएस अरिघात’ ही पाणबुडी भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.

संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे काळजीपूर्वक विश्लेषण करण्यात आले आहे. याची माहिती राजकीय नेतृत्व व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. अणुहल्ल्याच्या प्रसंगी देशाची प्रतिकार करण्याची क्षमता सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण आहे.

पाण्यातून लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता

‘के-४’ बॅलेस्टीक क्षेपणास्त्र हे पाण्यातून लक्ष्यावर मारा करण्यासाठी तयार केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) यापूर्वी क्षेपणास्त्राच्या व्यापक चाचण्या केल्या होत्या. यातून सामरिक शस्त्रांसाठी आवश्यक असलेल्या निकषांच्या पूर्ततेचे परीक्षण करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in