माझ्या मुलीने सुनक यांना पंतप्रधान बनवले; सुधा मूर्तींनी कथन केले पत्नीच्या योगदानाचे महत्त्व

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे.
माझ्या मुलीने सुनक यांना पंतप्रधान बनवले; सुधा मूर्तींनी कथन केले पत्नीच्या योगदानाचे महत्त्व

"माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केले", असे विधान ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी व प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी केले आहे. पतीच्या भरारीमागे पत्नीचे मोठे योगदान असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

सुधा मूर्ती म्हणाल्या की, ‘पत्नीची ताकद खूप मोठी असते. पत्नी-पतीचे आयुष्य कसे बदलू शकते पाहा. मी माझ्या नवऱ्याला बदलू शकले नाही. मात्र, मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केले. तर माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान बनवले’. सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. या दोघांचा विवाह २००९ मध्ये झाला. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असले, तरीही त्यांचे कुटुंबीय गेल्या १५० वर्षांपासून ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. लग्नानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला असल्याचेही सुधा मूर्ती यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडीओत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in