भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा

देशात साखरेची कोणतीही कमतरता नसून किरकोळ बाजारात साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, असा ठाम दावा साखर उद्योगातील सर्वोच्च संस्था ‘इस्मा’ने सोमवारी केला.
भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा
भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा
Published on

नवी दिल्ली : देशात साखरेची कोणतीही कमतरता नसून किरकोळ बाजारात साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, असा ठाम दावा साखर उद्योगातील सर्वोच्च संस्था ‘इस्मा’ने सोमवारी केला.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘इंडियन शुगर मिल असोसिएशन’चे (इस्मा) अध्यक्ष नीरज शिरगावकर म्हणाले की, व्यापाऱ्यांची आणि मोठ्या ग्राहकांची सट्टेबाजी, तसेच खराब हवामानामुळे झालेले कमी उत्पादन यांसह विविध कारणांमुळे भाव वाढले आहेत. कारखानदारांनी कोणतीही कृत्रिम टंचाई निर्माण केलेली नाही आणि कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या साखरेचे दर वाढवण्यात त्यांचा कोणताही हात नाही, असेही ते म्हणाले.

शासनाने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिल्यानंतर साखरेचे भाव कमी होऊ लागले आहेत, अशी माहिती शिरगावकर यांनी दिली.

सप्टेंबर अखेर साखरेचा अंतिम साठा ३५ लाख टन असेल. १५ ऑक्टोबरच्या सुमारास साखर कारखाने सुरू होतील. त्याच महिन्यात सुमारे १० ते १२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, ऑक्टोबरची साखरेची मागणी २४ ते २५ लाख टन असेल, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in